Tap to Read ➤

क्रिकेटमधील ब्यूटी क्वीन; ड्युटी बजावण्याआधी चाहत्यांसाठी 'फ्लाईग किस'

कोण आहे ही महिला क्रिकेटर? जिनं मॅच आधी अन् व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी फ्लाईंग किस देत वेधलं लक्ष
व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच WPL च्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात होत आहे. महिला आयपीएल स्पर्धेतील आपल्या पहिल्या मॅच आधी गुजरात जाएंट्स फ्रँचायझी संघानं काही खास फोटो अन् व्हिडिओ क्लिप शेअर केल्याचे दिसते.
गुजरातच्या ताफ्यातील भारतीय अन् परदेशी महिला खेळाडूंनी चाहत्यांना हटके अंदाजात व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर सामना बघा अन् आमच्यावरील प्रेम कायम ठेवा, असा काहीसा संदेशही दिलाय.
या खास फ्रेममध्ये गुजरातच्या ताफ्यातील भारतीय ब्यूटी हरलीन देओलचा अंदाज एकदम झक्कास आहे. मॅच आधी ती  फ्लाईंग किस देताना दिसून येते. तिचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करून सोडणारा आहे.
भारतीय संघातील स्टार खेळाडू हरलीन देओल वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये गुजरातच्या ताफ्यातून खेळते. आपल्या खेळीशिवाय आपल्या खास अदाकारीनंही ती अनेकदा चाहत्यांना क्लीन बोल्ड करताना दिसून आले आहे.
भारतीय महिला संघातील ही खेळाडू आपल्या सौंदर्याची जादू अन् स्टायलिश अंदाजानं बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते.
फिल्डवरील कॉट अँण्ड बोल्डचा सीन अन् फिल्ड बाहेरील हॉट अँण्ड बोल्ड अंदाज दोन्ही गोष्टींमुळे ती चर्चेत असते.
क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीसह सोशल मीडियावरील चाहत्यांसोबतच्या कनेक्टिव्हीटीसह तिने मोठा चाहतावर्ग कमावला आहे.
आता WPL च्या तिसऱ्या हंगामात ती गुजरातच्या संघाकडून कशी कामगिरी करणार याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा असतील.
क्लिक करा