WPL 2025 : MI ची नॅटली ऑरेंज कॅप घालून नटली; पर्पल कॅप कुणाकडे?
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचा दिसतोय जलवा, सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरसह इथं पहा कुणी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
महिला प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामात पहिल्या हंगामातील चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स महिला संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत मुंबई इंडियन्सची नॅटली सायव्हर ब्रंट सर्वात आघाडीवर आहे.
नॅटली सायव्हर ब्रंट हिने ३ सामन्यातील ३ डावात २ अर्धशतकासह १७९ धावा केल्या आहेत. नाबाद ८० ही तिची यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च धावंसख्या आहे.
आरसीबीची एलिस पेरी ३ सामन्यातील ३ डावात २ अर्धशतकासह १४५ धावा करून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गुजरात जाएंट्सची ॲशली गार्डनर हिने ३ सामन्यातील ३ डावात २ अर्धशतकाच्या मदतीने १४१ धावा केल्या असून नाबाद ७९ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. ती या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दिसते.
त्यापाठोपाठ या यादीत भारताच्या स्मृती मानधनाचा नंबर लागतो. आरसीबी कॅप्टन स्मृती मानधनाने ३ सामन्यातील ३ डावात एका अर्धशतकाच्या मदतीने ११६ धावा केल्या आहेत. ८१ ही तीची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताची रिचा घोषही टॉप ५ मध्ये दिसते. तिने ३ सामन्यातील ३ डावात एका अर्धशतकाच्या मदतीने १०३ धावा केल्या आहेत. नाबाद ६४ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.
गोलंदाजीमध्ये आरसीबीच्या ताफ्यातील जॉर्जिया वेरहॅम हिने टॉप क्लास कामगिरीसह पर्पल कॅपवर कब्जा केलाय. ३ सामन्या ११ षटके गोलंदाजी करताना तिने ७ विकेट्स टिपल्याआहेत.
रेणुका सिंग ठाकूरसह ॲनाबेल सदरलँड आणि प्रिया मिश्रा ३ सामन्यात प्रत्येकी ५-५ विकेट्स घेत अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असल्याचे दिसते.