Women's Day Special : ऑफिससाठी निवडा १० सुंदर साड्या, दिसाल रुबाबदार
महिला दिनाच्या दिवशी ऑफिसमध्ये पार्टील असेल तर असा करा लूक
८ मार्चला दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांसाठी खास मानण्यात आला आहे. जर आपणही ऑफिस किंवा पार्टीला जाणार असू तर या पद्धतीच्या साडीचे कलेक्शन कपाटात असायला हवे.
रॉयल लूक येण्यासाठी आपण साधी गोल्डन रंगाची साडी ट्राय करु शकतो. यावर कोणत्याही रंगाचा ब्लाऊज मॅच करता येईल.
आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपण साधी प्लेन काळ्या रंगाची साडी घालू शकतो. प्लेन साडीवर भरलेला ब्लाऊज उठून दिसेल.
जर आपल्याला कमी वजनाची आणि हलकी साडी हवी असेल तर लाल किंवा निळ्या रंगाची साडी परिधान करु शकता.
स्टायलिश लूकसाठी आपण ब्लाऊज ऑफ शोल्डर असणारा घालू शकता.यामध्ये पांढरा रंग सौंदर्यात भर घालेल.
नवीन काही तरी ट्राय करायचे असेल तर गुलाबी रंगाची रफल साडी आहे. यावर रंगबेरंगी ब्लाऊज छान दिसेल.
सध्या छोट्या बॉर्डरच्या साड्या बाजारात पाहायला मिळतात. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि ग्लॅमरस लूकसाठी आपण ती देखील ट्राय करु शकतो.
निळ्या रंगाची साडी बाजारात सध्या खूप चर्चेत आहे. प्लेन आणि छोटे वर्क केलेली साडी आपल्या सौंदर्याला साजेशीर ठरेल.