तुमच्या 'या' सवयीमुळे तुम्ही मोबाईलचं नुकसान करत आहात.
अनेक जणांना मोबाईल १०० % चार्ज करायची सवय असते. मात्र, तुमच्या या सवयीमुळे तुम्ही तुमच्याच मोबाईलचं नुकसान करत आहात.
मोबाईल १०० % चार्ज केल्यामुळे बॅटरीची लाइफ कमी होते.
मोबाईल पूर्ण चार्ज झाल्यानंतर व्होल्टेज वाढतो आणि बॅटरीमधील रासायनिक रचना कमकुवत होते.
काही वेळा मोबाईल जास्त चार्ज झाल्यामुळे ओव्हर हिट सुद्धा होतो.
तज्ज्ञांच्या मते, मोबाईलची बॅटरी कायम २० ते ८० टक्क्यांच्यामध्येच चार्ज असावी.
फोनची बॅटरी कधीही 0 टक्क्यांपर्यंत येऊ देऊ नका. त्यामुळे सुद्धा बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.