Tap to Read ➤

इलॉन मस्क यांचा डोनाल्ड ट्रम्प यांनी खिसा कापला?

टेस्लाचे शेअर १५.४ टक्के घसरल्याने संपत्तीमध्ये घट
जगातील सर्वाधिक श्रीमंत इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मधुर संबंधांमुळेच ट्रम्प प्रशासनात मस्क यांना महत्त्वाचं स्थान आहे. पण, ट्रम्प यांची साथ घेतल्यापासून मस्क यांचा खिसा वेगानं कापला जात आहे.
ट्रम्प निवडून आल्यानंतर टेस्लाच्या शेअरनं मुसंडी मारताना त्यांचा भाव जवळपास दुपटीनं वधारला होता. त्यानंतर मात्र त्यात सातत्यानं घसरणच होते आहे.
अमेरिकन शेअर बाजारात सोमवारी मोठी झाली. घसरणीत घसरण यात अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाचे शेअर १५.४ टक्क्यांनी घसरले.
यामुळे मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात २९ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार रविवारी एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३३० अब्ज डॉलर इतकी होती. सोमवारी त्यात घट होऊन संपत्ती ३०१ अब्ज डॉलरवर आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंदीबाबत केलेल्या टिप्पणीमुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आणि पडझडीचे सत्र सुरू झाले.
टेस्ला कंपनीलाला फटका बसला. टेस्लाच्या शेअरमधील घसरण याला कारणीभूत ठरली. सप्टेंबर २०२० नंतरची टेस्लाच्या शेअरची ही सर्वांत मोठी इंट्राडे घसरण ठरली. ज्यात कंपनीचे बाजार भांडवल ८०० अब्ज डॉलरने घटले.
क्लिक करा