सोन्याच्या किंमती इतक्या वेगाने का वाढताहेत? समजून घ्या
वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याची किंमत किती होऊ शकते?
जगभरात वाढलेली व्यापार युद्धाची भीती तसेच आर्थिक मंदीची चिंता यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे, असे जाणकार सांगतात.
कमकुवत डॉलर आणि महागाईच्या चिंतेमुळे सोने महाग होत चालले आहे. सोन्याच्या आयातीवरील शुल्क वाढीच्या भीतीमुळेही जागतिक बाजारातून सोन्याची मागणी वाढली आहे.
मंदीच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्रत्येक देश पाहत असतो. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करण्यावर भर दिला आहे.
जगभरातील बँकांनी मागील तीन वर्षात सहा वर्षाच्या तुलनेत अधिक सोने खरेदी केले आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (ईटीएफ) वाढत्या गुंतवणुकीमुळेही सोन्याच्या किमती वाढल्यास चालना मिळाली आहे.
जाणकारांच्या मते भू-राजकीय तणाव वाढल्यामुळे सोन्याला बळ मिळत आहे. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकही वाढत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे.
अशा स्थितीत, यावर्षी सोने प्रतितोळा ९२ हजार रुपयांच्या घरात जाऊ शकते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तज्ज्ञांच्या मते चांदीची किंमतही वर्षाअखेरीपर्यंत प्रतिकिलो १,०८,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.