Tap to Read ➤

मेकअप केल्यानंतर चेहरा काळा का पडतो?

मेकअप करताना फाउंडेशन कसे असायला हवे?
प्रत्येक स्त्रीला आपण अधिक सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात.
चेहऱ्यावर सतत काहींना काही लावत असतात. या काळात अनेकदा मेकअपचा ट्रेंडही बदलत असतो.
बरेचदा मेकअप आपण घाईघाईने करतो, ज्यामुळे मेकअप व्यवस्थित होत नाही आणि तो खराब होतो. त्यामुळे चेहरा काळ पडतो, ज्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात.
जर आपली त्वचा कोरडी असेल आणि त्यावर फाउंडेशन आणि मेकअप वेगळ्या प्रकारे केल्याने चेहरा काळ दिसतो.
तसेच डोळ्यांजवळ आणि नाकाजवळ काळ्या रेषा तयार होतात. यासाठी आपण योग्य रंग आणि कन्सीलर वापरणे महत्त्वाचे असते. मेकअप करण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टेप्सनुसार करायला हवा.
आपण जेव्हा मेकअप करु तेव्हा घाई करु नका. घाईघाईत मेकअप केल्याने मेकअपचा लूक खराब होऊ शकतो. म्हणून योग्यरित्या मेकअप करायला हवा.
मेकअप करताना नेहमी ब्रश स्वच्छ असायला हवा. घाणेरडे ब्रश वापरल्याने चेहऱ्यावर मुरुमे आणि काळे डाग येऊ शकतात.
क्रीम किंवा फाउंडेशन वापरताना ते आपल्या त्वचेच्या रंगानुसार निवडा आणि योग्यरित्या लावा. यामुळे तुमच्या मेकअपचा लूक वाढेल.
क्लिक करा