सर्व प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी त्यांचे मोबाईलफोनफ्लाईटमोडमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो.
सर्व प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी त्यांचे मोबाईलफोनफ्लाईटमोडमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. यामागे कारण काय आहे?
फ्लाईट मोड मोबाईलमधील सगळे वायरलेस कनेक्शन बंद करून टाकतो. यामुळे कॉल, मेसेज आणि डेटा सगळ्या सुविधा बंद होतात.
मोबाईलसिग्नल विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यत्यय आणू शकतात. फ्लाईट मोड रेडिओसिग्नल बंद करतो, ज्यामुळे हा व्यत्यय टाळता येतो.
एफएए आणि आयसीएओ सारख्या संस्था मोबाईलसिग्नलवर निर्बंध घालतात कारण ते महत्त्वाच्या उपकरणांवर परिणाम करू शकतात म्हणून, उड्डाणादरम्यानफ्लाईट मोड अनिवार्य आहे.
उड्डाणादरम्यान, फोन सतत नेटवर्क शोधतो, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. फ्लाईट मोड बॅटरी वाचवतो.
जास्त उंचीवर, फोनला एकाच वेळी अनेक टॉवर दिसतात, जे नेटवर्क ब्लॉक करू शकतात. फ्लाईट मोड ही समस्या सोडवतो.
लँडिंग दरम्यान फोनसिग्नलमुळे वैमानिकाच्या संवादात व्यत्यय येऊ शकतो. फ्लाईटमोडमुळे हवाई वाहतूक नियंत्रण योग्य राहण्यास मदत होते.
उड्डाण करताना फ्लाईट मोड चालू न केल्याने तुमचा फोन खराब होईलच, पण एअरलाइन कंपनी तुमच्यावर दंड देखील आकारू शकते.
जर तुमच्या फ्लाईटमध्ये इन-फ्लाईटवाय-फाय असेल तर तुम्ही ते वापरू शकता. तुमचा फोनफ्लाईटमोडमध्ये असताना तुम्ही वाय-फाय किंवा ब्लूटूथ वापरू शकता.
फ्लाईटमोडमुळे उड्डाण सुरक्षित आणि सोयीस्कर होते. प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.