सोन्यापेक्षाही महाग असतो हिरा, तरी बँका का देत नाहीत लोन?
पाहा यामागे काय आहे कारण?
अनेक ठिकाणी सोन्याऐवजी चांदी आणि हिऱ्यावरील कर्जाबाबत तुम्ही ऐकलं असेल. पण जेव्हा तुम्ही ते घेण्यासाठी जाता, तेव्हा नकार दिला जातो.
तुम्ही कधी विचार केलाय केलाय का? की सोन्यापेक्षा महाग असूनही हिऱ्यावर कर्ज का मिळत नाही.
जेव्हा तुम्ही हिऱ्याची अंगठी घ्यायला जाता, तेव्हा ती सहजच लाखांमध्ये मिळते. पण जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा त्यावर तुम्हाला मूल्य मिळत नाही.
आजकाल बहुतांश हिरे हे लॅब ग्रोन असतात. ज्यामुळे त्याला चकाकी तर मिळते, पण रिटर्न व्हॅल्यू मिळत नाही.
काही वर्षांपूर्वी हिरे कोळशाच्या खाणीतून काढले जायचे, त्यामुळे ते महाग होते. परंतु आता अनेक ठिकाणी पर्यावरणाच्या कारणास्तव यावर बंदी आहे. त्यामुळे हिरे लॅबमध्येच बनतात.
हे हिरे मायनिंगच्या हिऱ्यापेक्षा वेगळे असतात. बँकांना त्याचं खरं मूल्य माहित असतं. म्हणून सोन्यापेक्षा महाग असूनही त्यावर कर्ज मिळू शकत नाही.
गोल्ड लोन तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांमधून मिळू शकतं. याचे व्याजदर तुलनेनं कमी असतात आणि पैसेही लगेच मिळतात.