वन-डेत सर्वात जलद द्विशतक कोणी झळकावले?; पाहा लिस्ट!
ग्लेन मॅक्सवेलने नाबाद द्विशतक ठोकत एकहाती ऑस्ट्रेलियाला विजयी केले.
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज इशान किशन याने २०२२ साली बांगलादेशविरुद्ध वन-डेत सर्वात जलद द्विशतक झळकावले होते. इशान किशनने १२६ चेंडूत हे द्विशतक केले होते.
ऑस्ट्रेलिया संघाचा ग्लेन मॅक्सवेलने यंदाच्या म्हणजेच २०२३च्या वन-डे विश्वचषकात अफगाणिस्तान संघाविरुद्ध नाबाद द्विशतक केले. यावेळी मॅक्सवेलने १२८ चेंडूत द्विशतक पूर्ण केले.
क्रिस गेलने २०१५ साली झिम्बाब्वे संघाविरुद्ध १३८ चेंडू खेळत द्विशतक झळकावले होते.
विरेंद्र सहवागने २०११ रोजी वेस्टइंडिजविरुद्ध १४० चेंडूत द्विशतक मारले होते.
शुभमन गिलने याच वर्षी म्हणजेच २०२३मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध १४५ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते.
महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने २०१० साली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १४७ चेंडूत द्विशतक झळकावले होते.
फखर जमान याने २०१८ साली झिम्बाब्वेविरुद्ध १४८ चेंडूत द्विशतक पूर्ण केले.
रोहित शर्माने २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध १५१ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते.
मार्टिन गप्टिलने २०१५साली वेस्टइंडिज संघाविरुद्ध द्विशतक केले. यावेळी गप्टिलने १५३ चेंडूत हे द्विशतक पूर्ण केले.