मुंबईकर छोरी सायलीची टीम इंडियात एन्ट्री; तिच्यासंदर्भातील खास स्टोरी
कॅप्टन स्मृती मानधना हिने मुंबईकर गर्ल सायलीला पदार्पणाची कॅप दिली.
सायलीच्या क्रिकेट प्रवासातील खास क्षणी तिच्या कुटुंबियातील मंडळीही उपस्थितीत होती.
सायली सातघरे ही बॉलिंग ऑलराउंडर असून ती उजव्या हाताने मध्यम जलगती गोलंदाजीसह ती फलंदाजीही करण्यात सक्षम आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना तिने लक्षवेधी कामगिरी करून दाखवली आहे.
२०२१ च्या महिला वनडे ट्रॉफी स्पर्धेत तिने मुंबईकडून खेळताना एका सामन्यात फक्त ५ धावा खर्च करून ७ विकेट्स घेत लक्षवेधून घेतले होते.
२०२३-२४ च्या सिनीयर वुमन्स वनडे ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तिने दबावात १०० धावांची खेळी करत बॅटिंगमधील कौशल्य दाखवून दिले होते.
सायलीनं ५१ लिस्ट ए सामन्यात मुंबईकडून प्रतिनिधीत्व करताना ६६६ धावांसह ५६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
महिला प्रीमियर लीगमध्ये ती गुजरात जायंट्स संघाचा भाग आहे. २०२४ मध्ये १० लाख बोली लावत गुजरातनं या ऑलराउंडरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होते. २०२५ च्या मिनी लिलावाआधी संघाने तिला रिटेन केले आहे.