कोण आहे सोनीपतची सोनपरी हिमानी? जी झालीये गोल्डन बॉय नीरजची बायको!
दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रानं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली लग्नाची बातमी
भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने रविवारी सोशल मीडियावरुन काही फोटो शेअर करत आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
हिमानीच्या साथीनं आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करतोय असा उल्लेख नीरज चोप्रानं आपल्या लग्नाच्या फोटोंमध्ये केला. इथं जाणून घेऊयात कोण आहे हिमानी मोर...ती करते काय? यासंदर्भातील सविस्तर माहिती
नीरज चोप्रा प्रमाणेच हिमानी मोर ही देखील एक खेळाडू आहे. ती एक टेनिस स्टार आहे.
हरयाणातील सोनीपत येथील हिमानी मोर हिने साउथईस्टर्न लुइसियाना युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे.
तिने फ्रँकलिन पियर्स यूनिवर्सिटीमध्ये पार्ट-टाइम टेनिस असिस्टंट कोचच्या रुपातही काम केले आहे.
हिमानी हिने अमेरिकेत स्पोर्ट्स अँण्ड मॅनेजमेंटमध्येचे उच्चशिक्षण घेतले आहे.
सध्याच्या घडीला ती EMRS कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट असिस्टंटच्या रुपात काम करते. महिला टेनिस ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंटची जबाबदारीही तिच पाहते.