Tap to Read ➤

युजवेंद्र चहलशी घटस्फोट, धनश्रीच्या करिअरचे पुढे काय?

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा घटस्फोटामुळे सध्या सोशल मिडीयामध्ये चर्चेत आहेत...
त्यांच्या या घटस्फोटामुळे कोण आहे धनश्री वर्मा हे जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे.
धनश्री वर्मा एक उत्कृष्ट डान्सर आणि कोरिओग्राफर तर आहेच पण ती एक प्रसिद्ध डेंटिस्ट देखील आहे.
धनश्री टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा सिझन ११' मध्येही दिसली होती.
धनश्री वर्मा या डान्स रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, तिने आपल्या नृत्य कौशल्याने तिच्या चाहत्यांना भुरळ पाडली होती.
धनश्री वर्मा यूट्यूबर देखील आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवर २.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
धनश्री वर्मा तिच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, ब्रँड एंडोर्समेंट आणि कोरिओग्राफी द्वारे भरपूर कमाई करते.
लॉकडाऊनमध्ये चहलने धनश्रीकडे डान्स क्लास सुरू केला होता.
युजवेंद्र आणि धनश्रीने ऑगस्ट २०२० मध्ये साखरपुडा केला. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
लग्नाला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत २० मार्च २०२५ रोजी घटस्फोट घेतला आहे.
क्लिक करा