Tap to Read ➤
२२ व्या वर्षी चार कंपन्यांचा मालक; अक्ट्रेसचे लग्नही लावलेले, चर्चेत
आसाममध्ये २२०० कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा समोर आला आहे.
आसाम पोलिसांनी शेकडो कोटी रुपयांच्या शेअर बाजार घोटाळ्याचा छडा लावला आहे. या प्रकरणात २२ वर्षीय बिशाल फुकन याला अटक केली आहे.
हा तोच मुलगा आहे ज्याने आसामच्या अॅक्ट्रेसचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले होते.
आता आसामचे पोलीस ती अॅक्ट्रेस आणि कोरिओग्राफर असलेल्या सुमी बोराहच्या शोधात गुंतले आहेत.
या पठ्ठ्याने २०० हुन अधिक लोकांना शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या नावाखाली फसविले आहे. 2200 कोटींचा स्कॅम समोर आला आहे.
अवघ्या २२ व्या वर्षी त्याने २००० कोटींची संपत्ती गोळा केली आहे. त्याने एका फार्मा कंपनीही टाकली आहे.
त्याने आसामची अॅक्ट्रेस सुमी बोराच्या लग्नासाठी राजस्थानच्या उदयपूरमध्ये करोडो रुपये खर्च केले होते.
त्याने ६० दिवसांत लोकांना बँकेच्या व्याजापेक्षा जास्तीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दिले होते. यामुळे लोकांनी त्याच्याकडे करोडो रुपये गुंतविले होते.
या पैशांतून त्याने सुमीच्या साथीने चार कंपन्या उघडल्या होत्या. सुमीचा तो त्याच्यासाठी ढाल म्हणून वापर करायचा.
पोलिसांनी दिब्रुगढ येथून फुकनला अटक केल्यानंतर सुमी फरार झाली आहे.
क्लिक करा