हे माहितीये का? या देशात ५० टक्के लोक राहतात भाड्याच्या घरात
जगात कोणत्या देशात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे?
हक्काचे घर असावे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु प्रत्येकालाच असे घर घेणे जमतेच असे नाही. यासह इतरही अनेक कारणांमुळे अनेक जण भाड्याच्या घरात राहत असतात.
जर्मनीत तर निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या भाड्याच्या घरात राहत आहे. ऑस्ट्रिया, डेन्मार्कमध्येही हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
यूरोस्टॅटच्या अहवालानुसार जर्मनीमध्ये सर्वाधिक म्हणजे ५०.९ टक्के लोक भाड्याच्या घरात राहतात.
ऑस्ट्रियामध्ये ४५.८ टक्के लोकांचा कल भाड्याच्या घरात राहण्याकडे आहे. तर डेन्मार्कमध्ये ४०.८ टक्के लोक राहतात.
फ्रान्समध्ये ३५.३ टक्के, स्वीडनमध्ये ३५.१ टक्के, आयर्लंडमध्ये ३० टक्के, नेदरलँडमध्ये २९ टक्के लोक भाड्याच्या घरात राहतात.
फिनलंडमध्ये २९.७ टक्के, ग्रीस २६.७ टक्के, स्पेनमध्ये २४.२ टक्के, पोर्तुगालमध्ये २१.७ टक्के, पोलंडमध्ये १३.२ टक्के लोक भाड्याच्या घरात राहतात.
क्रोएशिया आणि रोमानियामध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. हंगेरीमध्ये ८.३ टक्के, तर रोमानियामध्ये ४.७ टक्के लोक भाड्याच्या घरात राहतात.