Tap to Read ➤

कोणत्या देशातील हॉटेलांत ग्राहक देतात सर्वाधिक टीप?

रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये अनेकजण टीप देतात, पण कोणत्या देशात सर्वाधिक टीप दिली जाते?
हॉटेलात गेल्यानंतर बिल भरल्यानंतर तेथील वेटर, अन्य कर्मचाऱ्यांना बक्षीस अर्थात टीप देण्याची प्रथा फार जुनी आहे.
काही देशांमध्ये हे प्रमाण फारच नगण्य आहे, जाणून घेऊया बिलाच्या तुलनेत कुठे किती टीप दिली जाते याबाबत.
२०% अमेरिकेत सामान्यपणे बिलाच्या २० टक्के रकमेइतकी रक्कम टीप म्हणून दिली जाते. भारतात हे प्रमाण तुलनेत फार कमी आहे.
भारतामध्ये सामान्यपणे ७ टक्के टीप दिली जाते. तर सर्वात कमी म्हणजे शून्य टीप चीनमध्ये दिली जाते.
अमेरिकेनंतर सर्वाधिक टीप कॅनडामध्ये दिली जाते. कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये १५ टक्के टीप दिली जाते.
इस्रायलमध्ये १२ टक्के, नॉर्वेमध्ये १० टक्के, रशियामध्ये १० टक्के, सौदी अरेबियामध्ये १० टक्के दिली जाते.
स्पेनमध्येही १० टक्के, फ्रान्समध्ये १० टक्के, इग्लंडमध्ये १० टक्के, जर्मनी ५ टक्के, तर बांगलादेशमध्ये २ टक्के टीप दिली जाते.
क्लिक करा