साखरेचं करु नका अतिसेवन, होतील शरीरावर दुष्परिणाम
निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपला आहार नीट, व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कोणते पदार्थ किती प्रमाणात खावे यावर नियंत्रण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपल्याकडे गोड खाणाऱ्यांची काही कमी नाही. परंतु, अती गोड खाणं शरीरासाठी घातक आहे. म्हणूनच, गोड खाण्याचे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात ते पाहुयात.
साखरेचं अती सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.
साखरेमुळे सुस्ती येते. त्यामुळे कामातील उत्साह निघून जातो. इतकच नाही तर काहींना अशक्तपणाही जाणवतो.
साखरेचा रक्तदाबावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
चॉकलेट, मिठाई किंवा साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वेगाने वाढू लागते.
तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या हाडांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.