अनेक ठिकाणी गुंतवलेले तुमच्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी काय करावं?
म्युच्युअल फंड, मुदत ठेव, पीपीएफ, विमा पॉलिसी अशा अनेक पर्यार्यामध्ये लोक गुंतवणूक करत असतात.
खातेधारकांचा आकस्मिक मृत्यू, नामनिर्देशन योग्य प्रकारे न करणे, मॅच्युरिटीनंतर पैसे वेळेत न काढणं, पत्ता-नावात बदल किंवा अन्य कारणांमुळे हे पैसे वेळेवर काढले जात नाहीत.
जागरूकतेचा अभाव, कागदपत्रे हरवणे आदींमुळे ही रक्कम अनेक वर्षे पडून राहते. हे नुकसान टाळण्यासाठी पत्ता किंवा संपर्काची माहिती बदलल्यास संस्थेला कळवावं, संबंधित कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत. नॉमिनीशी संबंधित माहिती आणि एक्सेस द्यावा.
यामुळे तुमच्या मृत्यूनंतर गुंतवणुकीची स्थिती अनक्लेम्ड राहणार नाही. गुंतवणुकीचा ट्रॅक ठेवण्यासाठी रेग्युलेटरी बोईस आणि आर्थिक संस्थांची ऑनलाइन टूल्स व पोर्टल्सचा वापर करावा. अनक्लेम्ड डिव्हिडंड व शेअर्सच्या पुनर्प्राप्तीसाठी ऑनलाइन डेटाबेस उपलब्ध आहे.
आयआरडीएआयनंही अनक्लेम्ड विमा रक्कम तपासण्यासाठी टूल्स उपलब्ध केली आहेत. डिजिटल रिमाइंडर्स किंवा कॅलेंडर अलर्टचा वापर करावा, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकींची नियमित तपासणी करू शकाल.
ही रक्कम परत मिळवताना अनेकदा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. जुन्या आणि विसरलेल्या गुंतवणुकीची रिकव्हरी करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेता येते.