प्रेग्नंसीच्या पहिल्या महिन्यात स्त्रियांनी घ्या काळजी, चुकूनही करु नका 'या' गोष्टी
प्रेग्नंसी काळात स्त्रियांना कायमच काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
जगातली सुंदर गोष्ट म्हणजे आई होणं. पण, हा आनंद कितीही सुखद असला तरीसुद्धा त्याच्या बरोबर येणारी जबाबदारीही तितकीच मोठी आहे.
प्रेग्नंसी काळात स्त्रियांना कायमच काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. यात खासकरुन पहिले तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात.
प्रेग्नंसीच्या पहिल्या महिन्यात स्त्रियांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आज पाहुयात.
अनेक स्त्रियांना मद्यपान करायची सवय असते. मात्र, प्रेग्नंसी काळात कधीच मद्यपान करु नये. यामुळे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.
आईने प्रेग्नंसीच्या काळात मद्यपान केल्यास मुलांची स्मरणशक्ती कमी होते. तसंच त्यांना झोपेसंबंधीत तक्रारी निर्माण होतात.
मद्यपानाप्रमाणेच धुम्रपान करणंही प्रेग्नंट स्त्रियांसाठी आणि त्यांच्या बाळासाठी घातक आहे. यामुळे डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रेग्नंसी काळात चहा, कॉफीचं सेवनही मर्यादित प्रमाणात करावं. कॅफिनयुक्त पेयाचं सेवन केल्यामुळे बाळाच्या हृदयाच्या गतीवर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे गर्भपातासारख्या घटना घडू शकतात.
जास्त मेहनतीची आणि जड कष्टाची काम पहिल्या तीन महिन्यात टाळावी. कोणत्याही प्रकारची दगदग या दिवसात करु नये.
प्रेग्नंसीच्या काळात मानसिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये. आईने ताण घेतल्यास त्याचा परिणाम बाळावरही होतो.
मुलींना इंप्रेस करायचंय? मग मुलांनी नक्की फॉलो करा या ग्रुमिंग टिप्स