Tap to Read ➤

घरातील घड्याळ कोणत्या दिशेला लावणे असते शुभ?

घरातील घडाळ्याविषयी वास्तूशास्त्रात काही टीप्स देण्यात आल्या आहेत.
अनेकविध गोष्टी आपण घरात ठेवत असतो. अनेक गोष्टी आपल्या मनाजवळच्या असतात. काही गोष्टी गरजेच्या, तर काही हौस म्हणून आपण घरात ठेवत असतो.
अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट अशी आहे, जी गरज आणि हौस म्हणूनही घरात ठेवतो. ती म्हणजे घड्याळ. अनेक रंगांची, प्रकारांची, आकारांची, शैलीची, पद्धतीची घड्याळे पाहतो.
घड्याळ ही वस्तू मोबाइलपासून घरातील भिंतींपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो. घरातील भिंतींवर लावल्या जाणाऱ्या घडाळ्याविषयी वास्तूशास्त्रात काही टीप्स सांगण्यात आल्यात.
आपल्या जीवनात काही समस्या असतील, तर त्यामागे 'वेळ' हाही एक घटक कारणीभूत असू शकतो, असे वास्तूशास्त्र सांगते.
येथे वेळेचा अर्थ काळ असा नसून, घड्याळ असा आहे. वास्तूशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करून आपण आपली 'वेळ' सुधारू शकतो.
घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये, असे सांगितले जाते.
दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष त्या दिशेकडे जाते. याने घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये, असा सल्ला दिला जातो.
काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते. आजचे धकाधकीचे जीवन घड्याळावर अवलंबून असते. योग्य दिशेला घड्याळ लावणे फायदेशीर ठरू शकते.
उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम असते, असा सल्ला दिला जातो. या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा घरात येते.
याशिवाय सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते. वास्तूशास्त्राप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावर कधीही घड्याळ लावू नये.
यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो. काही वेळेस याचा आर्थिक आघाडींवरही याचा परिणाम जाणवू शकतो, असे सांगितले जाते.
वास्तूशास्त्राप्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये. असे केल्याने जीवनात बाधा निर्माण होऊ शकतात. तसेच परीश्रमाइतके फळ मिळत नाही.
कार्यक्षेत्रात अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नातेसंबंध ताणले जाऊ शकतात, असे सांगितले जाते. बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये.
घड्याळातील सेल संपले असतील, तर लगेच दुसरे घालावेत किंवा घड्याळामधील तांत्रिक त्रुटी शक्य तितक्या लगेच दुरुस्त करून घ्याव्यात. बंद पडलेले घड्याळ घरातील धन प्रवाह रोखते, असे सांगितले जाते.
घड्याळ खरेदी करताना रंगाचाही विचार केला जावा. कधीही निळा, काळा आणि नारंगी रंगाचे घड्याळ खरेदी करू नये. यातून बाहेर पडणारी ऊर्जा नुकसानकारक ठरू शकते, असे म्हटले जाते.
सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.
क्लिक करा