Tap to Read ➤

किती आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं घर व्हाईट हाऊसची किंमत?

व्हाईट हाऊसची उभारणी १७९२ ते १८०० दरम्यान करण्यात आली.
व्हाईट हाऊसची उभारणी १७९२ ते १८०० दरम्यान करण्यात आली. आयरिश वंशाचे अमेरिकन वास्तुविशारद जेम्स होबेन यांनी ते डिझाइन केलं होतं.
व्हाईट हाऊसमध्ये १३२ खोल्या आहेत आणि ६ मजली इमारत आहे. यामध्ये २ बेसमेंट आहेत. व्हाईट हाऊसमधील ओवल ऑफिस राष्ट्राध्यक्षांचं मुख्य ऑफिस आहे.
व्हाईट हाऊसची ईस्ट रुम औपचारिक कार्यक्रमांची प्रेस कॉन्फरन्ससाठी आहे. याठिकाणी ट्रम्प माध्यमांसोबत चर्चा करतात.
याचं बाजारमूल्य ठरवणं आव्हानात्मक आहे. निरनिराळ्या स्त्रोतांनुसार त्याची अंदाजे किंमत निराळी असू शकते. २०१४ च्या अंदाजानुसार त्याची किंमत ३९७.९ मिलियन डॉलर्स होती.
तर अन्य एका अंदाजानुसार याची किंमत १.५ बिलियन डॉलर्स ठरवण्यात आली होती.
क्लिक करा