Tap to Read ➤
गृहप्रवेशाला का घेतले जातात नववधूच्या पावलांचे ठसे?
नववधूला गृहलक्ष्मी म्हटले जाते आणि तिच्या स्वागताच्या वेळी कुंकवाची थाळी देखील ठेवली जाते, पण का? वाचा.
नवीन सुनेचे स्वागत करताना धान्याचा कलश उंबरठ्यावर ठेवला जातो, शिवाय कुंकवाच्या पावलांचे ठसे उमटवले जातात.
कुंकवाच्या पावलांनी गृहप्रवेश करणारी नववधू तिच्या पायगुणांनी धन, धान्य, सुख, संपत्ती घेऊन येते अशी मान्यता आहे.
नववधूला लक्ष्मीचे रूप म्हटले जाते आणि कुंकू लक्ष्मीला प्रिय असल्याने नववधूचे स्वागत कुंकवाच्या पावलांनी केले जाते.
नववधूच्या रूपाने जणू लक्ष्मी घरात प्रवेश करते, अशी त्यामागे भावना असते.
या सुंदर रिवाजामुळे कौटुंबिक सदस्यांचे परस्परांबद्दल प्रेम वाढते, जिव्हाळा वाढतो.
वास्तूमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी नववधूची कुंकवाची पावलं लाभदायी ठरतात.
धान्याने भरलेला कलश ओलांडून कुंकवाची पावलं उमटवल्याने घरात धनधान्याची उणीव भासत नाही.
म्हणून नवरात्रीमध्येही देवीची पावलं घरात आली हे दर्शवण्यासाठी कुंकवाच्या पावलांचे प्रतीकात्मक ठसे उमटवले जातात.
क्लिक करा