सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. पण जर ते चुकीच्या पद्धतीने खाल्लं गेलं तर पैसे आणि त्यातले पौष्टिक घटक दोन्हीही वाया जाऊ शकतात..
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात..
शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही सफरचंद नियमितपणे खाणं अतिशय उपयुक्त मानलं जातं.
पिकलेलं सफरचंद जेव्हा थोडं कडक असतं तेव्हाच ते खावं. साल मऊ पडून सुरकुतलेलं असेल तर ते सफरचंद खाणं टाळावं.
काही लाेक सफरचंद साल काढून खातात. असं करणंही चुकीचं आहे. कारण त्यामुळे त्याच्या सालांमध्ये असणारे अनेक पौष्टिक घटक वाया जातात.
काही जण सफरचंद खाण्याऐवजी त्याचा शेक करून पितात. पण ते कधीतरी ठिक आहे. तुम्हाला जर त्याचा उत्तम फायदा मिळवून घ्यायचा असेल तर ते त्याच्या नैसर्गिक अवस्थेतच खायला हवे.