Tap to Read ➤

विजेच्या बल्बमधून मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! LiFi तंत्रज्ञान काय आहे?

इंटरनेटच्या जगात तंत्रज्ञान दिवसेंदिवस चांगले होत आहे. या उत्तम तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला सुपरफास्ट इंटरनेट मिळेल.
सुपरफास्ट इंटरनेट स्पीडसाठी आपण वाय-फाय वापरतो. यावर तुम्हाला वायरलेस आणि फास्ट स्पीडसह इंटरनेट मिळेल. वाय-फाय पेक्षा जास्त स्पीडने वायरशिवाय इंटरनेट मिळाल्यास?
आम्ही Li-Fi तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत, याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे, पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे तंत्रज्ञान वाय-फाय पेक्षा जास्त वेगाने इंटरनेट पुरवते.
अलीकडेच इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगने प्रकाश आधारित वायरलेस कम्युनिकेशनसाठी स्टॅन्डर्ड सेट केले आहे.
या स्टॅन्डर्डमुळे Li-Fi तंत्रज्ञानाला जागतिक फ्रेमवर्क मिळेल. त्यामुळे त्याच्यात प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
LiFi हे लाइट फिडेलिटीचे छोटे रूप आहे. ही प्रकाशावर आधारित एक संप्रेषण प्रणाली आहे, जी वायरलेस इंटरनेट प्रसारित करू शकते.
यावर 100Gbps च्या स्पीडने इंटरनेट दिले जाऊ शकते. LiFi तंत्रज्ञान डेटा ट्रान्समिशनसाठी प्रकाशाचा वापर करते.
म्हणजेच कंपन्या इंटरनेट ऑफर करण्यासाठी दिवे वापरू शकतात. ते 5G आणि वायफाय सारखे संवादाचे दुसरे माध्यम बनेल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एलईडी बल्बमधूनही डेटा ट्रान्सफर करता येतो.
जेव्हा तुम्ही LED बल्ब चालू करता तेव्हा तो प्रकाश उत्सर्जित करेल. त्या प्रकाशाच्या साह्याने डेटा ट्रान्सफरही करता येतो. म्हणजे अगदी गल्लीबोळातूनही इंटरनेट देता येते.
LiFi.co च्या मते, वायरलेस डेटाचा वापर दरवर्षी 60 टक्क्यांनी वाढत आहे. यामुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी स्पेस संतृप्त होत आहे. अशा परिस्थितीत वायरलेस इंटरनेट पुरवण्यासाठी LiFi तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते.
क्लिक करा