वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाहीये, जाणून घ्या वारीबद्दल...
पंढरपूरची वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नसून ती माणसाच्या अंतर्बाह्य जीवनाला घडवणारी, शिकवणारी आणि झकास स्वरूपात बदलणारी प्रक्रिया आहे.
विनम्रताः लाखोंच्या गर्दीत कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. वारीमध्ये चालताना अहंकार आपोआप गळून पडतो.
सहिष्णुता आणि संयम: उन्हातान्हात, गर्दीत, त्रासात चालताना संयमाची आणि सहनशीलतेची खरी परीक्षा होते.
समानता आणि बंधुभाव: जाती, धर्म, वर्ग विसरून सर्व जण एकत्र चालतात; माणूसपणाची खरी ओळख पटते.
शिस्त आणि वेळेचे भान: टाळ, मृदुंग, विणा यांच्या ठेक्यावर चालणे, उठणे, जेवणे. ही शिस्त अंगवळणी पडते. सेवा आणि परस्पर मदत: वाटेत थांबलेल्यांना पाणी देणे,
स्वतःशी संवाद : हरिपाठ, अभंगाच्या ओव्या ऐकताना माणूस आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधतो. स्वतःशी बोलतो.
धैर्य आणि आत्मविश्वास : वारीत तहान-भूक, लांबचा प्रवास, कधी पाऊस, कधी ऊन. यामुळे मनोधैर्य वाढते.
संकल्प आणि निष्ठा: वारी करायचीच हा संकल्प आणि त्यासाठीची निष्ठा - हे आयुष्यभर उपयोगी पडतं.
संतांचे विचार आणि अभंगांचे आचरण: संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, चोखामेळा यांचे विचार मनात ठसतात.
सामाजिक एकात्मता आणि माणुसकी: पंढरीची वारी ही माणसाला सर्वामध्ये देव शोधण्याची कला शिकविते. प्रेमभाव, माणुसकी सांगत अंतःकरण शुद्ध करत जाते.