CIBIL स्कोअर काय आहे? कसा मोजला जातो? यात सुधारणा कशी करायची? पाहा...
CIBIL Score : तुम्हाला कर्ज हवे असेल, तर सर्वप्रथम तुमचा CIBIL स्कोर तपासला जातो.
CIBIL Score : तुम्ही कधी कर्ज घ्यायला बँकेत जाल, तेव्हा सर्वप्रथम तुमचा CIBIL स्कोर तपासला जातो. CIBIL चांगला असेल, तरच कर्ज तात्काळ कर्ज मिळते. पण CIBIL खराब असेल, तर कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकतात.
अनेक वेळा काही तारण दिल्यानंतर कर्ज मिळते, पण त्याचे व्याजदर जास्त असू शकतो. अशावेळी CIBIL स्कोअर चांगला असणे फार गरजेचे आहे. पण, हे CIBIL नेमके आहे तरी काय आणि हे कसे मोजले जाते?
CIBIL स्कोर हा तुमचा क्रेडिट स्कोअर आहे, ज्याला तुम्ही तुमचा आर्थिक अहवाल म्हणू शकता. हा स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल, तरच चांगला मानला जातो.
तुम्ही जास्तीत जास्त व्यवहार करुन त्यात सुधारणा करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला प्रथम CIBIL स्कोअर कसा मोजला जातो, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
पेमेंट हिस्ट्री- तुमची पेमेंट हिस्ट्री तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या गणनेमध्ये सर्वात मोठी भूमिका बजावते. यामध्ये तुम्ही किती पेमेंट वेळेवर केले, ते पाहिले जाते.
कोणतेही पेमेंट उशीरा केले असल्यास, किती विलंब झाला? किती वेळा पेमेंट किंवा ईएमआय चुकला, तेदेखील पाहिले जाते. CIBIL स्कोअरच्या गणनेमध्ये त्याचा वाटा सुमारे 30 टक्के आहे.
क्रेडिट एक्सपोजर- याशिवाय तुमची एकूण थकबाकी किती आहे, तुमच्या नावावर किती क्रेडिट किंवा कर्ज आहे आणि तुम्ही त्याचा किती वापर केला? हेदेखील पाहिले जाते. CIBIL स्कोअरच्या गणनेमध्ये त्याचा वाटा 25 टक्के आहे.
क्रेडिट प्रकार आणि कालावधी- CIBIL स्कोअरची गणना करताना तुमच्यावर कोणत्या प्रकारचे कर्ज आहे हेदेखील पाहिले जाते. यामध्ये किती असुरक्षित कर्जे आहेत आणि किती सुरक्षित कर्जे आहेत, हे तपासले जाते.
इतर घटक- या गणनेतील उर्वरित 20 टक्के तुमच्या कर्जाशी संबंधित इतर क्रियाकलाप तपासतात. यामध्ये तुम्ही नुकतीच किती कर्जे घेतली आहेत, हे पाहिले जाते. तसेच तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो काय आहे हेदेखील पाहिले जाते.