Tap to Read ➤
महिनाभर चपाती-भात खाल्ला नाही तर...?
महिनाभर चपाती आणि भात खाल्ला नाही तर आरोग्याला नुकसान होईल की, फायदा
खराब जीवनशैली, चुकीचा आहारामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आपण रात्रीच्या जेवणात नियमितपणे भात आणि चपाती खातो.
जर महिनाभर चपाती आणि भात खाल्ला नाही तर आरोग्याला नुकसान होईल की, फायदा जाणून घेऊया
रात्री जेवण केल्यानंतर आपण लगेच झोपतो. यामुळे आपली पचनक्रिया मंदावते. त्यासाठी रात्रीचा आहार आपला कसा असायला हवा याची काळजी घ्यायला हवी.
आपण रात्री भात आणि चपाती खाल्ली तर कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो. तसेच शरीराच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
रात्रीच्या जेवणात हलके अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडणार नाही. तसेच पचनक्रिया व्यवस्थित होईल.
भात- चपाती न खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल. तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवते.
रात्री हलके जेवण केल्याने शांत झोप लागते. तसेच अस्वस्थ वाटत नाही.
चपाती आणि भाताऐवजी आपण पनीर, डाळ, हिरव्या भाज्या खाऊ शकतो.
क्लिक करा