Tap to Read ➤

एसआयपी थांबवणं, प्लानमध्ये बदलासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या

स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेता अनेकजण एसआयपी अर्थात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमध्ये गुंतवणूक करतात.
स्वतःच्या तसंच कुटुंबाच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेता अनेकजण एसआयपी अर्थात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमध्ये गुंतवणूक करतात. मोठा फंड उभा करण्यासाठी हा पर्याय सध्या कमालीचा लोकप्रिय आहे.
परंतु अनेकदा काही संकट आल्यानं, आर्थिक गरज भासल्याने ही योजना थांबवण्याची वेळ येते किंवा त्यात काही बदल करावा, रक्कम वाढवावी वा कमी करण्याचा विचार मनात येतो. चांगला परतावा मिळत नसल्यास बंद करण्याचा विचार मनात येतो.
हा प्लान थांबवणं सोपं असतं. सर्व प्रक्रिया ऑनलाइन करता येते. यासाठी ज्या वेबसाइटवर किंवा अॅपवर एसआयपी सुरू केली तिथे लॉगिन करावं. यात म्युच्युअल फंड कंपनीची वेबसाइट, ऑनलाइन ब्रोकर किंवा तुमच्या बँकेच्या पोर्टलचाही उपयोग होतो.
तिथे एसआयपी मॉडिफाय म्हणजेच बदलणं किंवा पॉझ म्हणजे थांबवण्याचा पर्याय निवडा. बंद करण्यासाठी डिलिटचा पर्याय निवडावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल किंवा 'एसएमएस'द्वारे संबंधित मेसेज पाठवले जातात.
जर पुढील हप्ता तीन दिवसांत देय असेल तर तुम्ही एसआयपी रद्द करू शकत नाही. या हप्त्याचे प्रोसेसिंग पूर्ण करणं गरजेचं आहे. हे करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण याचा तुमच्या दीर्घकालीन संकल्पांवर परिणाम होत असतो.
क्लिक करा