Tap to Read ➤

आठवड्याभराच्या भाज्या विकत घेताना लक्षात ठेवा ९ गोष्टी...

भाज्या खरेदी करताना होणाऱ्या लहान सहान चुकांमुळे भाज्या दीर्घकाळ चांगल्या टिकून राहत नाही... यासाठी काही खास टिप्स...
काही भाज्या अशा असतात की ज्या फ्रिजमध्ये बराचकाळ चांगल्या टिकून राहत नाही. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच भाज्या खरेदी कराव्यात.
भाज्या विकत घेताना शक्यतो कापलेल्या भाज्या विकत घेणे टाळावे. दीर्घकाळ चिरुन ठेवलेल्या भाज्यामधील पोषणमूल्य कमी होते त्यामुळे त्या विकत घेणे टाळावे.
भाज्या चमकदार, चांगल्या दिसाव्यात म्हणून त्यावर वेगवेगळे केमिकल्सयुक्त स्प्रे फवारले जातात, अशा चमकदार भाज्या घेणं टाळावे.
पालेभाज्या विकत घेताना त्या पाण्याने भिजलेल्या ओल्या नसाव्यात यामुळे या भाज्या दीर्घकाळ न टिकता लगेच खराब होतात.
पॅकेजिंग केलेले मशरूम्स, बेबी कॉर्न्स, कडधान्य विकत घेताना सर्वातआधी त्याचा वास घेऊन ते खराब नाहीत याची खात्री करुन घ्यावी.
कोबी, फ्लॉवर, वांगी विकत घेताना त्यात अळ्या, किड नाहीत याची खात्री करुन मगच अशा भाज्या विकत घ्याव्यात.
टोमॅटो, कांदा, गाजर विकत घेताना ते आधी हाताने थोडे दाबून तपासून पाहावे, नरम नसल्यास मगच विकत घ्यावे लागेल.
भाज्या खरेदी करताना त्यात छिद्र असलेल्या भाज्या घेऊ नयेत, या छिद्रात किड, अळ्या असण्याची शक्यता असू शकते.
क्लिक करा