Tap to Read ➤

किडनीवर सूज येण्याची कारणे, माहीत आहे का?

किडनीवर सूज येण्याची वेगवेगळी कारणे असतात, जी तुम्हाला माहीत असली पाहिजे.
शरीरातील किडनी खराब झाल्यावर अनेक समस्या होतात. किडनीवर सूज आली तर समस्या वाढते.
किडनीवर सूज येण्याला मेडिकल भाषेत 'ग्लोमेरुलोनेफ्रायटिस' असं म्हटलं जातं.
किडनीचं फिल्टर हे फार छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांपासून तयार झालेलं असतं, याला ग्लोमेरुली असं म्हटलं जातं.
किडनीवर सूज आल्याची लक्षणे तुमच्या वेळीच लक्षात यायला हवी. जेणेकरुन त्यावर वेळीच उपाय करता यावे.
किडनीवर सूज आल्याची लक्षणे - सतत ताप येणे, लघवी करताना वेदना होणे, लाल रंगाची लघवी, कमी लघवी येणे, जास्त थकवा, श्वासाची दुर्गंधी ही प्रमुख लक्षणे आहेत.
किडनीवर सूज किंवा नेफ्रायटिस एक अशी स्थिती आहे ज्यात किडनीच्या मुख्य भागावर सूज येते. याने शरीरातील रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होते.
घशात खवखव होणे किंवा त्वचेवर कोणत्या प्रकारचं संक्रमण झालं आणि त्यावर वेळीच उपचार न घेतल्याने किडनीवर सूज येते.
मधुमेह, ल्यूपस आणि एएनसीए वस्कुल्टिससारख्या काही ऑटो इम्यून आजारांनी ग्रस्त लोकांना किडनीवर सूज येणे ही समस्या होऊ शकते.
अनेकजण वेगवेगळ्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी एंटीबायोटिक औषधांचं सेवन करतात. पण याचं जास्त सेवन करणं महागात पडू शकतं. याने किडनीवर सूज येऊ शकते.
क्लिक करा