Tap to Read ➤

ऑक्टोबरचा शेवट होईल गोड! ७ राशींना भरघोस लाभच लाभ; सुख-समृद्धी काळ

ऑक्टोबरची सांगता काही राशींना सर्वोत्तम लाभाची ठरू शकते, जाणून घ्या...
शुक्राचा राशीपालट गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र सिंहेत असून, कन्येत जाईल. रवि, मंगळ, बुध, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील. १ नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे. तुमच्यासाठी आगामी काळ कसा असेल? जाणून घ्या...
मेष: नवीन उमेद मिळू शकेल. संततीकडून सौख्य मिळेल. नोकरदारांसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा काळ. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागेल.
वृषभ: मानसिक ताण वाढू शकतो. खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल. येणारा काळ चांगला असेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. विनाकारण पैसा कोणाला देऊ नये.
मिथुन: पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. नोकरीत वरिष्ठांशी हुज्जत घालत बसू नका. व्यापारास अनुकूल काळ. गुंतवणुकीत फायदा मिळू शकेल. सरकारी योजनेचा लाभ घेण्यात यश मिळू शकेल.
कर्क: चांगली बातमी मिळू शकेल. कामानिमित्त धावपळ वाढेल. व्यापारासाठी काळ अनुकूल. फायदा होईल. नोकरदार मेहनतीच्या जोरावर चांगली कामगिरी करतील.
सिंह: मिश्र फलदायी काळ. खर्च जास्त होईल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. मेहनत यशस्वी होईल. व्यापाऱ्यांना काही नवीन व वेगळा विचार करावा लागेल.
कन्या: एखाद्या गोष्टीने खूप तणावग्रस्त असू शकता. यातून बाहेर पडायला संधी व आत्मविश्वास दोन्ही मिळेल. नोकरदारांना कालावधी अनुकूल. विद्यार्थ्यांनी संधीचा सदुपयोग करावा.
तूळ: मध्यम फलदायी कालावधी. खर्चात वाढ होईल. प्राप्ती चांगली होईल. योजना यशस्वी होतील. सावध राहावे. नोकरीत चढ-उतार येतील. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक: काळ मध्यम फलदायी. खर्चात वाढ. प्रसंगी बचत खर्ची घालावी लागू शकेल. हिंमत हारु नका. कालांतराने लाभ होईल. नोकरदारांची धावपळ वाढेल. मेहनत वाढवावी लागेल.
धनु: व्यापारात स्थिती जलद गतीने पुढे जाऊ लागेल. मोठा फायदा होईल. सरकारी क्षेत्राकडून लाभाची शक्यता. काम चांगले परिणाम मिळवून देईल. कर्तव्य पार पाडाल.
मकर: आगामी काळ अनुकूल. संततीकडून सुखद बातमी मिळू शकेल. नोकरीत पदोन्नती शक्य. पगारवाढ संभवते. अति आत्मविश्वासाने चुकीची कामे करू नयेत.
कुंभ: आगामी काळ चांगला. नशिबाच्या प्राबल्याने व्यापारात उत्तम यश मिळू शकते. प्रतिष्ठा, मान-सन्मानात वाढ. नोकरीत परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागेल.
मीन: आगामी काळ मध्यम फलदायी. हात आखडता ठेऊनच गुंतवणूक करावी. कालांतराचे दिवस उत्तम. खर्चात कपात तर प्राप्तीत वाढ होईल. बँकेतील शिल्लक वाढवू शकाल. जीवन सुखद होईल.
क्लिक करा