Tap to Read ➤

१० राशींना डिसेंबरचा शुभारंभ शानदार; सरकारकडून लाभ, नोकरी-व्यवसायात यश

डिसेंबर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असू शकेल? जाणून घ्या...
डिसेंबरची सुरुवात होताना ग्रहस्थिती अशी की, गुरु, हर्षल मेषेत, केतु, शुक्र कन्येत, शुक्र तूळेत, रवि, मंगळ वृश्चिक राशीत, बुध धनु राशीत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु, नेपच्यून मीन राशीत आहे.
काही दिवसांत डिसेंबर महिन्याची सुरुवात होत आहे. आर्थिक आघाडी, नोकरी, करिअर, व्यवसाय, व्यापार, कुटुंब, वैवाहिक जीवन या आघाड्यांवर शुभारंभ होईल का? जाणून घेऊया...
मेष: वैवाहिक जीवनात व्यक्तिगत सामंजस्य वाढेल. प्राप्तीत वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला. व्यापाऱ्यांसाठी लाभदायी काळ. यशाचे शिखर गाठू शकाल.
वृषभ: बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात व्यस्त राहतील. खूप धावपळ होईल. व्यापाऱ्यांना परिश्रमाचे खूप चांगले परिणाम मिळतील.
मिथुन: वैवाहिक जीवन उत्तम राहील. प्राप्तीतील कमतरता जाणवू शकेल. सतर्क राहा. विरोधकांपासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. नशिबाची साथ, यश प्राप्त होईल.
कर्क: अचानकपणे धनप्राप्ती होईल. थकबाकीचे पैसे येऊ शकतात. लॉटरी-शेअर्स बाजारातून चांगला फायदा होण्याची संभावना. सरकारी क्षेत्राकडून पैसे मिळू शकतात. गुंतवणुकीस अनुकूल काळ.
सिंह: मित्रांसह मौजमजा करण्याची संधी. कुटुंबियांसह फिरावयास जाल. मनोबल दृढ असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला. कष्टाचे चीज होईल. कदाचित एखादे मोठे बक्षीस मिळेल.
कन्या: वैवाहिक जीवन सुखद असल्याचे जाणवेल. अचानक धनलाभ होण्याची संभावना. सासुरवाडीकडून सहकार्य मिळेल. थकबाकी मिळू शकते. परिश्रम करत राहावे.
तूळ: एखादा मोठा फायदा होऊ शकतो. संधीचे सोने करु शकाल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च तर होतीलच. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. प्रयत्न यशस्वी होतील.
वृश्चिक: खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. व्यापाऱ्यांना काही प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.
धनु: आगामी काळ खूपच चांगला. घरासाठी काहीतरी चांगले करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी स्वतःला सिद्ध करून दाखवणारा काळ असेल. विरोधकांपासून सावध राहावे.
मकर: सर्वजण एकोप्याने राहतील. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना कामात काही शक्कल लढवावी लागेल. व्यापारी संधीचा फायदा घेतील.
कुंभ: नोकरी करणाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होईल. कामाचे समाधान मिळेल. व्यापाऱ्यांना काही नवीन योजनांसह काम करण्याची संधी मिळू शकते. परिश्रम यशस्वी होतील.
मीन: एखाद्या सोहळ्यात सहभागी व्हाल. नोकरदारांना कालावधी त्रासदायी असू शकतो. शांत राहून धीराने काम करावे. प्राप्ती चांगली असेल. व्यापाऱ्यांना कामातून लाभ होईल.
क्लिक करा