साप्ताहिक राशीभविष्य: वर्षाचा शेवटचा आठवडा कसा जाईल? तुमची रास कोणती?
सन २०२३ चा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...
मेष: कुटुंबाकडे विशेष लक्ष द्याल. आर्थिक प्राप्तीत खूप मोठे यश मिळवू शकाल. बँकेतील शिल्लक वाढेल. व्यापाऱ्यांना उत्तम प्राप्ती होईल. परिश्रम यशस्वी होतील.
वृषभ: आत्मविश्वास उंचावेल. प्राप्तीत वाढ. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ. परिश्रमाचे चीज होईल. व्यापारासाठी काळ यशदायी.
मिथुन: किरकोळ खर्च होतील. प्राप्तीत वाढ होईल. विरोधकांवर मात कराल. नोकरीत खुश राहाल. कामाचा आनंद घेऊ शकाल. जोड व्यवसायावर लक्ष देऊ शकाल.
कर्क: चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटेल. नोकरी असो किंवा कौटुंबिक जीवन दोन्ही ठिकाणी खूषच राहाल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. चांगला धनलाभ होऊ शकतो.
सिंह: जमीन-जुमल्याशी संबंधित एखादी मोठी बाब लक्ष वेधून घेईल. फायदा होऊ शकतो. कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना ज्ञानाचा लाभ होऊन अध्ययन उत्तम प्रकारे करू शकतील.
कन्या: गुप्त धन मिळू शकते. प्रॉपर्टी खरेदी करण्यात यश प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक स्थिती उत्तम राहील. खुश राहाल. पाठिंबा मिळेल. सहकारी मदत करतील.
तूळ: अत्यंत चांगला काळ. आत्मविश्वास उंचावेल. आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात करू शकाल. विद्यार्थी अभ्यासात अत्यंत कार्यरत राहून आनंद घेतील.
वृश्चिक: मन पूर्णतः खुश असल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना मनाप्रमाणे व्यापार करूनच लाभ होईल. व्यापार यशस्वी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.
धनु: सावध राहावे. खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती चांगली होईल. व्यापार वृद्धिंगत होईल. खुश व्हाल. मित्र व भावंडांचा पाठिंबा प्रगती करण्यात मदतरूप होईल.
मकर: प्राप्तीत वाढ झाल्याने मन हर्षित होईल. कुटुंबियांचे सहकार्य व समर्थन प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. किरकोळ खर्च होतील. कामाचा आनंद घेऊ शकाल.
कुंभ: प्रॉपर्टीचा सौदा करण्यात यश प्राप्त होऊन हाती एखादी मोठी प्रॉपर्टी लागू शकते. सरकारी क्षेत्राकडून चांगला लाभ. अति आत्मविश्वासात न राहिल्यास सर्व कामे उत्कृष्ट होतील.
मीन: आत्मचिंतन करून स्वतःच्या चुका शोधून काढाल. नोकरी करणाऱ्यांना कामात मोठा फायदा. व्यापारी काही नवीन योजनांची मदत घेऊ शकतात. प्राप्तीत वाढ होईल.