साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना शुभ काळ; नोकरीत यश, अपार लाभाची संधी!
जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…
या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र सिंहेत, रवी, मंगळ, केतू आणि बुध तूळ राशीत प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
दुर्गाष्टमी, महानवमी, विजयादशमी (दसरा), पाशांकुशा एकादशी, प्रदोष तर कोजागरी पौर्णिमा तसेच खंडग्रास चंद्रग्रहण आहे. याशिवाय पंचकही लागणार आहे.
मेष: कामात व्यस्त राहाल. कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. व्यापारात मोठी उलाढाल होईल.
वृषभ: अनुकूल काळ. आत्मविश्वास वाढेल. नोकर स्थिती मजबूत. फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन: आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. व्यापारासाठी फायदेशीर काळ. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल.
कर्क: व्यापारात तेजी येईल. नवीन ऑर्डर्स मिळतील. सरकारी क्षेत्राकडून मोठा फायदा. कामात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. बँकेतील शिल्लक वाढेल.
सिंह: मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्याने खुश व्हाल. प्रकृतीची काळजी घ्या. नशिबाची पूर्ण साथ. नोकरीतील स्थिती चांगली. फायदा मिळेल. व्यापाऱ्यांना अनुकूल काळ.
कन्या: आठवडा खूपच चांगला आहे. नोकरीत कनिष्ठांपासून थोडे सावध राहावे लागेल. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होऊ शकतो.
तूळ: प्राप्तीत वाढ तर खर्चात कपात झाल्याने हर्षित व्हाल. नोकरदारांना आठवडा चांगला. चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.
वृश्चिक: आठवडा अनुकूल. मित्रांची भेट होईल. खर्चातील वाढ काळजी वाढवू शकते. नोकरीत धावपळ वाढेल. काही जणांना परदेशात जाण्याची संधी शक्य.
धनु: ज्याचा विचार केला होता व ज्याची अपेक्षाही ठेवली नव्हती अशी सर्व कामे होतील. नोकरी किंवा व्यापार चांगली कामगिरी करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल.
मकर: मानसिक तणावातून मुक्त व्हाल. आत्मविश्वास वाढेल. खर्चात कपात होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापारांना चांगली निविदा मिळू शकते. क्षमता वाढेल.
कुंभ: आठवडा मध्यम फलदायी. काही खर्च अचानकपणे होतील. कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका. बदली संभवते. व्यापारी योजना यशस्वी होतील.
मीन: काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. प्रेम वृद्धिंगत होईल. प्राप्तीत वाढ होईल. अनेक ठिकाणांहून फायदा होऊ शकतो. अचानक पैसे मिळू शकतात.