साप्ताहिक राशीभविष्य: पगारवाढ, पदोन्नती योग; नोकरी-व्यापारात मोठा लाभ
जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
या सप्ताहात कुठलेही ग्रहपालट नाही. गुरु, हर्षल मेषेत, शुक्र, केतु कन्येत, रवी मंगळ, बुध वृश्चिकेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभत; तर राहु नेपच्यून मीन राशीत आहे.
चंद्राचे भ्रमण कर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. या सप्ताहात पंचक आहे. गुरुवारी प्रबोधनी एकादशी आहे. शुक्रवारी प्रदोष असून, तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे. चातुर्मास समाप्त होईल.
मेष: सुखद बातमी मिळण्याची संभावना आहे. कामानिमित्त प्रवास करू शकता. निर्यातीतून लाभ होईल. नोकरी चांगली चालेल. पदोन्नती संभवते. पगारवाढीची बोलणी करु शकता.
वृषभ: एकीकडे खर्च तर दुसरीकडे मानसिक ताण दोन्ही शीघ्र गतीने वाढतील. त्यामुळे चिंता वाढतील. प्राप्तीत सुधारणा होऊ लागेल. पदोन्नती संभवते. कौतुक होईल.
मिथुन: वैवाहिक जीवन सुखावह होईल. कोणतेही मोठे काम हाती घेऊ नका. विरोधकांपासून सावध राहा. व्यापारात तेजी येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
कर्क: घरात जमीन-जुमल्याशी संबंधित चर्चा होईल. मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यश प्राप्ती संभवते. बँकेतील शिल्लक वाढेल. शेअर बाजारात गुंतवणुकीतून फायदा.
सिंह: परिश्रम तर कराल, त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही. हिंमत हारु नका. आगामी काळात त्याची भरपाई होईल. कार्यक्षेत्री परिश्रम सुरुवच ठेवावे. काम करत राहावे.
कन्या: प्रॉपर्टीशी संबंधित कामातून फायदा होऊ शकतो. एखाद्या मोठ्या सौद्यातून लाभ होईल. कौशल्याचा वापर करत नोकरीत उत्तम कामगिरी करुन दाखवू शकाल.
तूळ: खर्चांवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकण्याची वेळ आता आली आहे. गुंतवणूक करणे सध्या जोखमीचे ठरू शकते. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून मोठा लाभ संभवतो.
वृश्चिक: काहीसा त्रास होईल. मानसिक चिंता व खर्चाने त्रस्त व्हाल. प्राप्तीत सुधारणा होईल. तीव्र बुद्धिमत्तेचा वापर कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कोणालाही आपले पैसे उसने देऊ नका.
धनु: प्राप्तीत वाढ होईल. किरकोळ खर्च होतील. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. सरकारी क्षेत्राकडून लाभ होण्याची संभावना आहे. प्रगतीची संधी मिळेल.
मकर: कौटुंबिक जीवनात समाधान राहील. वाद होण्याची संभावना आहे. लोकात कार्यकौशल्याचा जयजयकार होईल. प्राप्तीत वाढ होईल. समाधान लाभेल. आत्मविश्वास उंचावेल.
कुंभ: आजवर जे कष्ट घेतले आहेत, त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरी, व्यापार दोन्ही क्षेत्रात यश प्राप्ती. फायदा होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी शक्य.
मीन: एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर आताच मागणी घाला. यशस्वी होऊ शकता. प्राप्ती तर होईलच, परंतु खर्च जास्त होऊ शकतात. कामे वेळेवर पूर्ण कराल.