साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना दिवाळीत लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
दीपोत्सवाचा सप्ताह तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...
दीपावलीच्या या सप्ताहात गुरुवारी मंगळ, रवी यांचे राशीपालट आहे. गुरु हर्षल मेषेत, केतु शुक्र कन्येत, रवी, मंगळ तूळ राशीत, बुध वृश्चिकेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु, नेपच्यून मीन राशीत आहेत.
चंद्र भ्रमण तूळ, वृश्चिक, धन, मकर राशीत. या सप्ताहात नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दर्श सोमवती अमावास्या, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज, विनायकी चतुर्थी पांडव पंचमी, कड पंचमी आहे.
मेष: कार्यकौशल्य वृद्धिंगत होईल. काम अधिक चांगले करण्यास प्राधान्य द्याल. व्यापाऱ्यांना फायदा. विरोधकांपासून थोडे सावध राहा. नवीन कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करू शकता.
वृषभ: आनंददायी बातमी मिळेल. खुश व्हाल. नवी ऊर्जा निर्माण झाल्याची जाणीव होईल. व्यापारास अनुकूल काळ. योजना योग्य वेळेस योग्य कामे करतील. फायदा होईल.
मिथुन: नशिबाची साथ मिळेल. दीर्घ पल्ल्याचा प्रवास करू शकता. व्यापार अधिक सुस्थितीत येईल. काही संपर्कांचा लाभ होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल.
कर्क: व्यापारासाठी खूप धडपड कराल. एखादी परदेशवारी होऊ शकते. कारकीर्द उंचावेल. नोकरदारांना पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमेल.
सिंह: आठवड्याची सुरुवात चांगली होईल. कामगिरीने खूपच खुश असल्याचे दिसून येईल. व्यापारात कष्टाचे फळ मिळेल. एकापेक्षा अधिक ठिकाणांहून चांगला लाभ होऊ शकतो.
कन्या: जोडीदाराशी जवळीक वाढेल. नोकरदारांना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आत्मविश्वास उंचावलेला असेल. व्यापारात मोठा फायदा होईल. चांगला लाभ होऊ शकेल.
तूळ: कौटुंविक जीवनात ताण वाढत असल्याचे दिसून येईल. खर्चात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्न चांगले असतील. लाभ होईल. फायदा होईल.
वृश्चिक: मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. मन आनंदित होईल. वागणुकीत बदल होईल. कामात प्रगती होईल. व्यापाऱ्यांना शासनाकडून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
धनु: प्रकृती खर्च यांवर लक्ष ठेवले नाहीत तर समस्या वाढू शकतात. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. कुटुंबात सुख - शांती नांदेल. मित्रांचा पाठिंबा राहील.
मकर: वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. नोकरदारांना खूपच फायदेशीर ठरणारा काळ. नोकरीत बदल होऊ शकतो. व्यापाऱ्यांनी कामावर जास्त लक्ष द्यावे.
कुंभ: कार्यक्षेत्री उत्तम यश प्राप्त होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पद-प्रतिष्ठा उंचावेल. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारासाठी आठवडा उत्तम आहे. सरकारी क्षेत्राकडून लाभ.
मीन: काही नवीन गोष्टी समजून घेण्याची संधी. कामात अधिक चांगली सुधारणा शक्य. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांनी या काळात गुंतवणूक करणे धाडसीपणाचे ठरेल.