Tap to Read ➤

साप्ताहिक राशीभविष्य: पद-पैसा वाढेल, गुंतवणुकीत नफा; दिवाळी शुभच करेल!

दिवाळीची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य...
ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कन्येत, रवी, मंगळ, केतू आणि बुध तूळ राशीत, ६ नोव्हेंबरपासून बुध वृश्चिक राशीत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
दिवाळी प्रारंभ होणार आहे. देशभरात आनंदाचे, उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. तुमच्यासाठी दीपोत्सवाची सुरुवात कशी ठरेल? जाणून घ्या...
मेष: घरकामात खूपच व्यस्त राहाल. वैचारिक मतभेद होऊ शकतात. घरगुती खर्च होतील. व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. विरोधकांपासून सतर्क राहा. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल.
वृषभ: हा आठवडा चांगला आहे. मित्रांसह मौजमजा करण्यास जाऊ शकता. विरोधकांवर मात कराल. नोकरदारांचे परिश्रम यशदायी ठरतील. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढविण्यात यश मिळेल.
मिथुन: कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अत्यंत व्यस्त राहाल. मोठा फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धी. प्राप्ती उत्तम होईल. विविध स्रोतातून लाभ. नशिबाच्या साथीने कामे होतील.
कर्क: मित्रांशी उत्तम संबंध राहतील. आत्मविश्वास उत्तम असल्याने कामात यश प्राप्त. एखाद्या सरकारी निविदेसाठी अर्ज केल्याने मोठा फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात फायदा. खूप पैसे कमावू शकाल.
सिंह: खर्चात वाढ. कुटुंबियांशी समन्वयात काहीसा बिघाड. शासकीय लाभ संभवतात. कामावर जास्त लक्ष द्या. व्यापारी कामात खूप परिश्रम करतील. टेक्निकल व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ.
कन्या: कार्यात यश प्राप्त. बँकेतील शिल्लक वाढत असल्याचे दिसून येईल. खर्चात कपात होईल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत राहील. आत्मविश्वास उंचावेल. यथोचित फळ प्राप्त होईल.
तूळ: कौटुंबिक व व्यक्तिगत जीवनात समतोल साधण्यात यशस्वी व्हाल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चात अचानकपणे वाढ होईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे.
वृश्चिक: नशिबाची साथ मिळून प्रगतीची संधी मिळेल. कामे होतील. नोकरीतील स्थिती हळूहळू अनुकूल होऊ लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
धनु: कौटुंबिक जीवनात सुख-शांतीचा काही प्रमाणात अभाव राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. नोकरीत चढ-उतार येतील. कामात मन रमणार नाही. व्यापारात यश प्राप्त होईल.
मकर: कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत होईल. परिश्रमाचे फळ मिळेल.आत्मविश्वास उंचावेल. लोक सल्ला घेण्यासाठी येतील. यश, नशिबाची साथ मिळेल.
कुंभ: भरपूर खर्च होतील. प्राप्ती मध्यमच राहील. नोकरदारांना आठवडा चांगल. सकारात्मक परिणाम मिळतील. सहकारी पाठिंबा देतील. आळस झटकावा लागेल. सरकारी क्षेत्राकडून काही लाभ संभवतो.
मीन: हा आठवडा अत्यंत चांगल. वैवाहिक जीवन सुखावह होईल. प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमेल. कार्यात यशस्वी व्हाल.
क्लिक करा