सध्याच्या काळात स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर बळावणारा आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्त्रियांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळेच त्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. आणि, कॅन्सर वा अन्य काही आजार त्यांच्या शरीरात प्रवेश करतो.
आहारात अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही.
आतापर्यंत खोकल्यावर गुणकारी म्हणून डाळिंबाकडे पाहिलं जात होतं. परंतु, हेच डाळिंब कॅन्सर रोखण्यासाठीही उपयोगी आहे. यात असणारे एलागिटॅनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाहीत.
ब्रोकली, फ्लॉवर, कोबी या भाज्यांमध्ये सल्फोराफेन नावाचं संयुग असतं, जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतं.
ज्या महिला नियमितपणे सोया उत्पादनांचा आहार समावेश करतात, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तुलनेने कमी असतो.
आवळा आणि पेरू हे दोन्ही व्हिटॅमिन सीने परिपूर्ण आहेत. व्हिटॅमिन सी, शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.
पेरूमध्ये लायकोपिन हे संयुग असतं, जे कॅन्सरच्या पेशींशी लढण्यास मदत करतं.