Tap to Read ➤

दररोज ३GB डेटासह Vi चा स्वस्त प्लान, अनलिमिटेड बेनिफिट्ससह बरंच काही

व्होडाफोन-आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.
व्होडाफोन-आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आणि एअरटेल पाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स व्हीआयशी जोडलेले आहेत.
व्हीआयच्या रिचार्ज प्लानबद्दल बोलायचं झालं तर व्हीआय आपल्या युजर्सना खूप चांगले रिचार्ज प्लान ऑफर करते. इतकेच नाही तर व्हीआय आपल्या रिचार्ज प्लानमध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय डेटा डिलाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हरसारखे फायदे देखील देते.
आज आम्ही तुम्हाला व्हीआयच्या सर्वात स्वस्त अशा प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात युजर्संना दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळतो. व्हीआयचा हा प्लान त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्यांना दररोज अधिक डेटाची आवश्यकता असते. चला जाणून घेऊया.
दररोज ३ जीबी डेटा असलेला व्हीआयचा सर्वात स्वस्त प्लान तुम्ही ४४९ रुपयांत खरेदी करू शकता. ४४९ रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची पूर्ण वैधता मिळते. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि रोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो.
व्हीआयच्या या प्लानची खास गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये युजर्संना व्हीआयएमटीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळतं, ज्यामध्ये युजर्स पूर्ण १६ ओटीटीचा फायदा घेऊ शकतात.
इतकेच नाही तर युजर्संना या प्लानमध्ये रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा, डेटा डिलाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हरसारखे बेनिफिट्सही मिळतात.
क्लिक करा