Vodafone-Idea युझर्ससाठी आनंदाची बातमी, मोफत मिळणार 'ही' सुविधा
Vodafone-Idea ने प्रीपेड युझर्ससाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे.
स्मार्टफोन कंपन्या वेळोवेळी फीचर्समध्ये बदल करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बदलाबद्दल सांगणार आहोत.
Vodafone-Idea ने प्रीपेड युझर्ससाठी आनंदाची बातमी देत eSIM सेवेची घोषणा केली आहे. त्याची सुरुवात कंपनीनं मुंबईत केली आहे.
हे भारतीय युझर्सना जलद आणि पर्यावरणपूरक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, असं कंपनीनं मीडिया स्टेटमेंटमध्ये म्हटलं.
कंपनीचं eSIM iOS आणि Android युझर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
अनेक स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच उपकरणांसाठी eSIM हा एक चांगला पर्याय ठरणार असल्याचंही कंपनीनं नमूद केलंय.
eSIM असण्याचे अनेक फायदे आहेत. eSIM च्या मदतीने तुम्ही एकाच डिव्हाइसवर अनेक प्रोफाइल वापरू शकता.
जर तुम्ही eSIM वापरत असाल तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण याच्या मदतीने तुम्ही प्रायमरी सिम न काढता दुसरं सिम वापरू शकता.
व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन्स ऑफर करत आहे. ३१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Amazon Prime Video चं सबस्क्रिप्शनही देण्यात येतंय.