Tap to Read ➤

...अन् विराट कोहली शाकाहारी झाला!

विराट कोहली फिटनेसबाबत फार काळजी घेतो.
विराटला बालपणी बिर्याणी खाणं खूप पसंत होतं. पण विराट व्हेजिटेरिअन झाला आहे. त्याने मांसाहार सोडला आहे.
पण विराटच्या एका पोस्टमुळे पुन्हा नॉन-व्हेजिटेरिअन झाला का? अशी चर्चा सुरूये. पण सत्य वेगळंच आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ तो व्हेजिटेरिअन का झाला होता.
विराटने आता विगन डाएट सुरू केली आहे. म्हणजे केवळ मांस, अंडी, मासेच नाहीतर त्याने ते सगळं खाणं बंद केलंय जे अॅनिमल प्रोडक्ट्सपासून बनतं. तो दूध, दही, तूपही खात नाही.
विराटचं असं मत आहे की, यामुळे त्याचा खेळ आणखी चांगला झाला. विराटच्या सध्याच्या डाएटमध्ये प्रोटीन शेक, पालेभाज्या आणि सोयाचा समावेश आहे.
विराटने सांगितलं होतं की, तो एका शारीरिक समस्येमुळे व्हेजिटेरिअन झाला. त्याच्या सर्वायकल स्पाइनमध्ये समस्या होती. या समस्येमुळे त्याच्या हाताची एक नर्व दाबली जात होती. ज्यामुळे हाताला थरथरी येत होती. फार वेदना होत होत्या.
'मला एका व्यक्तीने सांगितलं होतं की, माझं पोट फार अॅसिडिक झालं आहे. माझ्या हाडांमधून कॅल्शिअम खेचलं जातंय. त्यानी मला डाएट बदलण्यास सांगितलं आणि मी आज त्या निर्णयाने आनंदी आहे'.
सूत्रांनुसार, कोहलीने ही डाएट दीड ते दोन वर्षांपासून सुरू केली आहे. आता त्याला जास्त फीट वाटत आहे. कारण त्याची पचनशक्ती वाढली आहे. आता त्याला मांस, अंडी किंवा डेअरी प्रॉडक्ट आवडत नाही.
विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने नॉन व्हेज सोडलं आहे. विराट याबाबत खूप आधीपासून विचार करत होता. 2018 मध्ये त्याने नॉन-व्हेज खाणं बंद केलं.
क्लिक करा