विराट ते सचिन! ३०० वनडे खेळण्याचा टप्पा पार करणारे ७ भारतीय क्रिकेटर
न्यूझीलंड विरुद्धचा सामना किंग कोहलीसाठी स्पेशल, कारण...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा साखळी फेरीतील सामना भारताचा स्टार बॅटर विराट कोहलीसाठी एकदम खास असेल.
दुबईच्या मैदानात उतरताच किंग कोहली ३०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणाऱ्या भारतीय दिग्गज्जांच्या यादीत सामील होईल.
इथं एक नजर टाकुयात भारताकडून ३०० पेक्षा अधिक वनडे खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटर्सच्या खास रेकॉर्सवर
भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ४६२ वनडेत सर्वाधिक १८४२६ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
महेंद्रसिंह धोनीने भारताकडून ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १०७७३ धावा केल्या आहेत.
राहुल द्रविडनं आपल्या वनडे कारिकिर्दीत ३४४ सामन्यात १०८८९ धावा केल्याची नोंद आहे.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनही या यादीत आहे. त्याने ३३४ वनडेत ९३७८ धावा काढल्या आहेत.
सौरव गांगुलीनं ३११ वनडेत ११३६३ धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे.
युवराज सिंगच्या खात्यातही ३०४ वनडे खेळल्याची नोंद आहे. यात त्याने ८७०१ धावा केल्या आहेत.