किंग कोहलीला ९ हजारीचा 'विराट' डाव साधण्याची संधी!
याआधी टीम इंडियातील कुणी कुणी गाठला आहे हा मैलाचा पल्ला
विराट कोहलीनं मागील ८ डावात फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत तो ही उणीव भरून काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ५३ धावा करत खास क्लबमध्ये एन्ट्री मारण्याची संधी आहे.
१६ ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ५३ धावा करताच विराट कोहली कसोटीत ९ हजारीचा पल्ला गाठेल. असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.
कोहलीनं आतापर्यंत ११५ कसोटी सामन्यात ८९४७ धावा केल्या आहेत. ज्यात २९ शतकं आणि ७ द्विशतकांचा समावेश आहे.
कसोटीत ९ हजारीचा टप्पा पार करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत लिटल मास्टर सुनील गावसर यांचाही समावेश आहे. ते कसोटीत १० हजारीचा पल्ला गाठणारे पहिले क्रिकेटरही आहेत.
याशिविवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यासह सर्वाधिक धावा आणि शतके झळकवणाऱ्या मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरचाही या यादीत समावेश आहे.
भारताचा माजी क्रिकेटर आणि कोच राहुल द्रविडनंही त्याच्या कसोटी कारकिर्दीत हा पल्ला पार केला होता.