Tap to Read ➤

अनुष्का नव्हे तर ही बॉलिवूड अभिनेत्री होती विराट कोहलीची पहिली क्रश

जाणून घ्या किंग कोहलीसंदर्भातील काही खास गोष्टी
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ५ नोव्हेंबरला बर्थडे साजरा करतो. १९९८ मध्ये दिल्लीत जन्म झालेल्या कोहलीनं क्रिकेट जगतात आपली वेगळी छाप सोडली आहे. स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीतही तो किंग ठरतो.
क्रिकेटशिवाय विराट कोहलीला टेनिस आणि फुटबॉलची आवड होती. या खेळात त्याने क्रिकेटला पहिली पसंती दिली. आज तो या खेळातील किंग आहे.
विराट कोहलीनं आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट किपिंगही केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीनं गोलंदाजी केली त्यावेळी कोहली किपरच्या रुपात दिसला होता.
अनुष्का शर्मासोबत लग्नबंधनात अडकण्याआधी विराट कोहलीचं नाव अनेकजणींशी जोडले गेले. त्यात ब्राझीलची मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेली लेएटी , बॉलिवूड अभिनेत्री तारिका सारा, तमन्ना भाटिया आणि संजना यांचा समावेश आहे.
विराट कोहली हा सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. आज त्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी केली जाते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यात प्रेमाचं गाणं वाजलं अन् ते चांगलेच गाजलं. ही जोडी जमली अन् ती हिटही ठरतीये. पण तुम्हाला माहितीये का? त्याची पहिली क्रश ही काही अनुष्का शर्मा नाही.
नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर ही विराट कोहलीची पहिली क्रश आहे, खुद्द विराट कोहलीनं एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट शेअर केली होती.
क्लिक करा