Vinesh Phogat सह असे आंतरराष्ट्रीय खेळाडू जे सध्या आहेत आमदार-खासदार
आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणारे असे चेहरे ज्यांनी राजकीय क्षेत्रात सोडली खास छाप
हरयाणातील जुलाना मतदार संघातून ऐतिहासिक विजय नोंदवत आखाडा गाजवणारी आंतरारष्ट्रीय कुस्तीपटू आता आमदार झालीये.
या नव्या आमदार चेहऱ्यासह एक नजर सध्याच्या घडीला आमदार-खासदार असणाऱ्या आंतराष्ट्रीय खेळाडूंवर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी महिला नेमबाज श्रेयसी सिंह एक सर्वोत्तम खेळाडू आहेच. एवढेच नाही तर हा चेहरा आमदारही आहे. स्पोर्ट्स वुमन बिहारमधील जमुई मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आली होती.
टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करणारा क्रिकेटर मनोज तिवारी पश्चिम बंगालमधील आमदार आहे. एवढेच नाही तर या खेळाडू क्रीडा मंत्री देखील आहे.
भारताचा माजी क्रिकेटर अशोक दिंडा हा २०२१ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राजस्थानमधील मोयनाचा आमदार झाला.
१९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य कीर्ती आझाद हे देखील सध्याच्या घडीला खासदार आहेत.
भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण याने तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकत खासदारकी मिळवली आहे.
भारताचे माजी फुटबॉलपटू जेजे लालपेखलुआ फनाई हे झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाकडून मिझोराम विधानसभेची निवडणूक लढले होते. तेही सध्या आमदार आहेत.