Tap to Read ➤
विद्या बालन झाली आई?; 'ती' सीक्रेट मुलगी नेमकी कोण?
अभिनेत्रीने सोडलं मौन, अखेर सांगितलं 'सत्य', म्हणाली...
विद्या बालन ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री विमानतळावर एका मुलीसोबत दिसल्यानंतर सध्या तिची जोरदार चर्चा रंगली.
"विद्या तिच्या गोंडस मुलीसोबत" अशा कॅप्शनने एक व्हि़डीओ समोर आल्यावर अनेक अफवा पसरल्या.
अभिनेत्रीनेच या अफवांवर आता प्रतिक्रिया दिली आहे आणि सत्य सांगितलं आहे.
एचटी सिटीला दिलेल्या मुलाखतीत विद्याने सीक्रेट मुलगी असल्याच्या चर्चेवर मौन सोडलं.
"ती माझ्या बहिणीची मुलगी इरा आहे. तिला जुळी मुलं आहेत, मुलगा रुहान आणि मुलगी इरा" असं म्हटलं आहे.
विद्याचं तिच्या बहिणीच्या मुलांवर आईसारखं प्रेम असून ती त्यांना तिची "ट्विन लाईफलाइन्स" म्हणते.
विद्याने चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत.
विद्याचे अनेक चाहते असून ते आवर्जून तिच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.
क्लिक करा