Tap to Read ➤
काय सांगता- आपण रोज खात असलेल्या 'या' भाज्या भारतातल्या नाहीच!!
आपण सगळेच भारतीय रोज कोणती ना कोणती विदेशी भाजी खात असतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
बटाटा आपण सगळेच नेहमीच खातो. उपवासालाही तो चालतो. पण बटाटा हा मुळचा साऊथ अमेरिकेचा आहे.
टोमॅटोसुद्धा मुळचा भारतीय नाही. टोमॅटोसुद्धा साऊथ अमेरिकेतूनच आपल्याकडे आले आहेत. पोर्तुगीजांनी ते इकडे आणले.
मिरच्यासुद्धा पोर्तुगीजांच्या मार्फत साऊथ अमेरिकेतून आपल्याकडे आल्या आहेत. त्याआधी तिखटासाठी भारतीय लोक मिरे वापरायचे.
पत्ताकोबी ही मुळची युरोपातली. काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ती आपल्याकडे आली.
त्याचप्रमाणे फुलगोबी ही सुद्धा मुळची भारतीय भाजी नाही. ती सुद्धा मुळची युरोपमधलीच आहे.
गाजर हे अफगणिस्तानातून आपल्याकडे आले आहेत असं म्हटलं जातं.
तर मका हा सुद्धा मुळचा आपला नाही. तो मुळचा मध्य अमेरिकेचा आहे.
क्लिक करा