Tap to Read ➤

चमचाभर बेकिंग सोडा करतो १० भन्नाट कामं

बेकिंग सोड्याचा वापर फक्त पदार्थ करण्यासाठी नसून, किचनमधल्या अनेक गोष्टी साफ करण्यास मदत करते.
बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण गॅस शेगडी यासह बर्नर देखील साफ करू शकता.
काही डाळी शिजण्यास विलंब लावतात. डाळी लवकर शिजण्यासाठी आपण त्यात बेकिंग सोडा घालू शकतात.
किचनमधून बऱ्याचदा कुबट गंध येतो. तो दूर करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
सिंक ब्लॉकेज झाले असेल तर, त्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि कोमट पाणी ओता. सिंक पाईप साफ होईल.
भाज्या बेकिंग सोड्याच्या पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भाज्यांवरील बॅक्टेरिया निघतील.
फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचे पाणी उपयुक्त ठरेल.
नखांच्या स्वच्छतेसाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
दातांवरील पिवळा थर काढण्यासाठी बेकिंग सोडा मदत करेल.
भजी, वडे कुरकुरीत होण्यासाठी आपण बॅटरमध्ये चिमुटभर बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
क्लिक करा