Tap to Read ➤
भन्नाट कंडिशनर आहेत ' या ' ८ गोष्टी, विसरा महागडे कंडिशनर...
विकतचे कंडिशनर केमिकल्सयुक्त असतात, यावर सोपा उपाय म्हणजे घरच्या घरी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून हेअर कंडिशनर तयार करणे...
दही स्वतः एक अतिशय उत्तम नैसर्गिक हेअर कंडिशनर आहे. केसांना अर्धा तास दही लावून ठेवल्याने हा उपाय एक चांगला हेअर कंडिशनर ठरू शकतो.
कोरफडीचा गर घेऊन त्यात एक लिंबू पिळून हे मिश्रण केसांना २० मिनिटे लावून ठेवल्याने, केसांचे चांगले कंडिशनिंग केले जाते.
नारळाच्या तेलात कांद्याचा रस व लिंबाचा रस मिसळा आणि हे तेल आपल्या केसांमध्ये लावा. हे खूप चांगले कंडिशनर म्हणून काम करेल.
एक मगभर पाण्यांत २ टेबलस्पून अॅप्पल साइडर व्हिनेगर घालून याचा केसांसाठी कंडिशनर म्हणून वापर करावा.
केळ, दूध व मधाचे एकत्र मिश्रण तयार करून ते केसांना लावा. या तयार कंडिशनरमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि नैसर्गिक तेल असते.
दही व नारळाचे दूध एकत्र करून केसांना लावा, हे कंडिशनर केसांना मुलायम आणि चमकदार बनवते.
कोरफड जेल आणि बदामाचे तेल एकत्र करून केस धुण्याआधी ते केसांना लावा, यामुळे केस चांगले कंडिशनिंग केले जातील.
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात चहापत्ती घालून या पाण्याचा वापर देखील उत्तम कंडिशनर म्हणून केला जातो.
क्लिक करा