खरंच उर्वशीची हवा? अभिनेत्रीनं केला किंग कोहलीला मागे टाकल्याचा दावा
ती स्टोरी गायब, पण...जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूडमधील हॉट अँण्ड ब्युटीफुल अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटापेक्षा सोशल मीडियावरच अधिक हिट ठरलीये.
सोशल मीडियावर मोक्काट हवा करणाऱ्या या अभिनेत्रीनं आता विराट कोहलीला मागे टाकल्याचा दावा केला आहे.
अभिनेत्रीनं शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमुळे एक वेगळीच चर्चा रंगताना दिसतीये. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील गोष्ट
उर्वशी रौतेला सध्या तिच्या 'डाकू महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धी दरम्यान तिने लोकप्रियतेच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकल्याचा दावा केलाय.
तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून जी पोस्ट शेअर केलीये त्यात २०२५ मध्ये तिची लोकप्रियता विराट कोहलीपेक्षाही अधिक आहे, असा उल्लेख करण्यात आला होता.
तिची इन्स्टा स्टोरी गायब झाली, पण स्क्रीन शॉटच्या माध्यमातून तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाच्या फॉलोअर्सचा आकडा ७२ मिलियनच्या घरात आहे. विराट कोहलीच्या ती जवळपासही नाही. कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सचा आकडा २७० मिलियनच्या घरात आहे.